Cultural Department

(2019-2020)

(सांस्कृतिक विभाग)

पदवी स्तरावरील शिक्षण प्रक्रियेसह विद्यार्थी युवक युवतींच्या सुप्तावस्थेतील भारतीय सांस्कृतिक विषयक कला विशेषांना अभिव्यक्त करण्याचे स्वतंत्र विचार मंच असावे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक जाणिव विकसित व्हावी, गायन, नृत्य, अभिनय, पटनाट्य, एकांकिका, प्रश्नमंजुषावकृत्व स्पर्धा, रांगोळी, हस्तकला, लोककला आदी सांस्कृतिक कला प्रकारांची अभिरुचीसंपन्न रसिकता अंगी बनावी आणि त्याजोगे विविध सांस्कृतिक कला प्रकारांचा आस्वाद घेता यावा तथा प्रस्तुतीकरण करता यावे या उद्दात्त हेतूने महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक विभाग कार्यरत आहे.

आदरणीय प्राचार्य डॉटी. जी. गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन सांस्कृतिक विभाग कार्यकारिणी गठित करून मराठी वांडःमय प्रमुख प्रा राहुल तागडे यांच्या समन्वयवादी संयोजनाद्वारे महाविद्यालयांमध्ये या शैक्षणिक सत्रात विविध प्रकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ते पुढीलप्रमाणे आहेत.

 11 जुलै लोकसंख्या दिन:

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉटी. जी. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली 11 जुलै 2019 सकाळी 11.30 वाजता लोकसंख्या दिन या कार्यक्रमास्वरूप चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेसंपूर्ण विश्वात भारताच्या लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो आहे. या वाढत्या लोकसंख्येचा रोजगार वैयक्तिक आणि राष्ट्रीय उत्पन्न भारतीय सांस्कृतिक मूल्यसंवर्धन तथा तदनुषंगिक विविध बाबींवर पडणाऱ्या प्रभाव परिणामांवर या चर्चासत्रात सखोल चर्चा करण्यात आलीचर्चेत प्राप्रवीण राऊत, प्रासुयोग गजभिये, प्रातथागत गजभिये, प्राकिशोर मेंढे, प्रा. राहुल तागडे आदींनी आपले अभ्यासपूर्ण मते मांडून वाढत्या लोकसंख्ये सारख्या रुक्ष विषयांवरील चिंतनाकडे महाविद्यालयीन युवा वर्गाचे लक्ष केंद्रित केले.

 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे आणि लोक मान्य टिळक स्मृतिदिन:

प्राचार्य डॉ टीजीगेडाम यांच्या अध्यक्षतेखाली 1 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 12.00 अक्षर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक स्मृतिदिन या संयुक्तिक कार्यक्रमानिमित्त प्राराहुल तागडे, प्रासचिन कोल्हे प्राकिशोर मेंढे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यान सत्राचे सूत्रसंचालन प्राप्रविण राऊत तर आभार प्रा तथागत गजभिये यांनी केले.

 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन:

मा. राजकुमार मळामे संस्थासचिव, जनता बहुउद्देशीय संस्था, धोबीसराड यांच्या मंगल हस्ते 15 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8.15 वा भारतीय स्वातंत्र्यदिन या राष्ट्रीय उत्सव कार्यक्रमानिमित्त राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन, राष्ट्रगीत गायनराष्ट्रप्रेमआधारित गीत गायन, प्रासंगिक मार्गदर्शन भाषणे अशा विविध उपक्रमांची या कार्यक्रमात रेलचेल होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. टी. जी. गेडाम यांनी आपले मौलिक विचार मांडून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम समर्पित भावनेने सर्व पातळीवरील आव्हाने पेलवावी असे आव्हान केले. प्रावसंत साखरे, प्राराहुल तागडे यांनी भाषणे ने केली. सूत्रसंचालन प्रासचिन कोल्हे तर आभार प्रा. प्रवीण राऊत यांनी केले.

 सप्टेंबर विद्यार्थी स्वयंशासन दिन:

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर जन्मदिन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. टी. जीगेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन कला, वाणिज्य  विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांच्या एकत्रित सहकार्याने 5 सप्टेंबर 2019 रोजी विद्यार्थी स्वयंशासन शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आलेवांडःमय  स्नातक अंत्य वर्षाचे विद्यार्थी अजय अगळे यांनी प्राचार्य, कला स्नातक अंत्य वर्षाचे विद्यार्थी राधेशाम पाथोडे यांनी उपप्राचार्य, परिचर म्हणून अक्षय पंधरे आणि निराशा अगडे तर लिपिक म्हणून मासूम टेंभुर्णीकर या विद्यार्थ्यांसह अनेक विद्यार्थ्यांनी विषय शिक्षकांच्या अभिरूपी भूमिका संपादिल्याकला शाखेतून रोहित शेंडे, शिवकुमार मटाले, फुलेश्वरी मेश्राम वाणिज्य शाखेतून स्मिता बागडे, संगम नंदेश्वर, आशिका आंबेडारे विज्ञान शाखेतून काजल टेंभुर्णीकर, नीलम नेताम, किर्ती सुलाखे या विद्यार्थ्यांच्या शिक्षकीभूमिकांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी प्रा वसंत साखरे, प्रा. तथागत गजभिये, प्रा. राहुल तागडे, प्रा. किशोर मेंढे, प्रा. प्रवीण राऊत, प्रा. सुयोग गजभिये, प्रा. सिमा जवादे आदी मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र निवेदक प्रा. मनोज हेमने  तर आभार प्रा. संदिप मेंढे  यांनी केले.

 आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग:

यशवंत चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान  तिरपुडे सामाजिक कार्य महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशवंत शब्द गौरव आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य  विज्ञान महाविद्यालय सुरतोली/लोहारा येथील विद्यार्थ्यांना सहभागासाठी पाठविण्यात आलेही स्पर्धा नागपूर येथे 7 सप्टेंबर 2019 रोजी संपन्न झालीकाजल टेंभुर्णीकर, रोहित शेंडे, शिवकुमार मटाले, निरूताई रामटेके या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे नेतृत्व केलेमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. जी. गेडाम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेस्पर्धेसाठी संयोजक प्राराहुल तागडे यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले.

ऐच्छिक विषय भाषण स्पर्धा:

महाविद्यालयीन मराठी वांडःमय अभ्यास मंडळ आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक विषय भाषण स्पर्धेचे आयोजन शनिवार 14 सप्टेंबर 2019 रोजी ठीक 9:30 वाजता करण्यात आलेभाषण विषयाचे आर्थिक विषय, पर्यावरण विज्ञानवादी भौगोलिक विषय, क्रीडा, ऐतिहासिक  संविधानिक भाषा कलादी सांस्कृतिक विषय अशा ऐच्छिक पाच विभागांमध्ये विभागणी करण्यात आलीया स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेत चेतना चणकापूरे (स्वच्छ भारत) रोहित शेंडे (पुलवामा) तर सागर टेंभुर्णीकर (पुलवामा) या विद्यार्थ्यांनी कन्सोलिखित विषयांवरील आपल्या भाषण कौशल्यास अनुक्रमे प्रथम, द्वितीय  तृतीय या क्रमांकाने विभूषित केलेस्पर्धेचे संयोजक प्रा. राहुल तागडे, सूत्रसंचालन दिव्या पटले तर आभार रत्नमला वाल्दे यांनी केले

 

Mission & Vision

To inculcate the spirit of virtues and morals which is important for ideal citizen development.  Our innovative teaching and learning model helps students meet the challenges of higher education and earn the degree credentials they need to advance their careers.

Source of Inspiration

श्रद्धेय केवलरामजी मळामे

Secretary

आदरणीय राजकुमारजी मळामे